‘दिविजा वृद्धाश्रम’ आणि सन्मा. अविनाश फाटक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आभाळाएवढ्या शुभेच्छा!

असलदे गावात २५ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वस्तिक फाऊंडेशन संस्थेचा ‘दिविजा वृद्धाश्रम’ सुरु झाला आणि गेल्या पाच वर्षात प्रामाणिक, कार्यक्षम व निःस्वार्थी वृत्तीने केलेल्या समाजसेवेचा खराखुरा आदर्श रचला गेला. स्वस्तिक फाऊंडेशन संस्थेचे विश्वस्त म्हणून सन्मा. अविनाश फाटक साहेब यांची समाजसेवेला वाहून घेण्याच्या वृत्तीने वृद्धांच्या सेवेचा वटवृक्ष उभा राहिला. त्यांचाही आज वाढदिवस! म्हणूनच ‘दिविजा वृद्धाश्रम’ आणि सन्मा. अविनाश फाटक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या आभाळाएवढ्या शुभेच्छा! त्यांच्या समाजसेवेला सलाम! त्यांच्या समाजसेवेला परमात्मा सुयश देवो; ही मनःपूर्वक प्रार्थना!

‘दिविजा वृद्धाश्रम’- असलदे गावात ‘स्वस्तिक फाऊंडेशन’ने पाच वर्षांपूर्वी ‘दिविजा वृद्धाश्रम’ सुरू केला. निराधार वृद्धांना नव्या उमेदीने जगण्यासाठी पोषक वातावरण मिळाले. समाजापासून तुटलेल्या आजी-आजोबांच्या आयुष्याची संध्याकाळ सुखकर झाली. वयोमानानुसार वृद्धांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यात जर कौटुंबिक आधार नसेल तर त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होते. म्हणून ‘दिविजा वृद्धाश्रम’ने केलेले कार्य कौतुकास्पद आहे आणि ते आमच्या असलदे गावात होत असल्याने आमच्यासाठी ते अभिमानास्पद आहे. ‘दिविजा वृद्धाश्रम’च्या शुभारंभाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही पाक्षिक `स्टार वृत्त’चा विशेषांक प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये मी माझे भूमिका सविस्तरपणे मांडली होती. आज पाच वर्षानंतर ‘दिविजा वृद्धाश्रम’च्या माध्यमातून झालेल्या कार्याला नतमस्तक होणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. ह्या सर्व कार्यात वृद्धाश्रमाला जमीन देणारे कोकण विकास आघाडीचे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक बळीराम परब उर्फ आबा, आमचे मित्र उपसरपंच सन्मा. सचिन परब यांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेऊन असलदे गावातील वृद्धांच्या सेवेला जो हातभार लावला, त्यालाही आमचा सलाम! सामाजिक कार्याची आवड असलेल्या दीपिका रांबाडे आणि संदेश शेटय़े यांनी ‘दिविजा वृद्धाश्रम’साठी केलेले कार्यही कौतुकास्पद आहे. मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्या, `सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’ ह्या भारतात अग्रस्थानी असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख विश्वस्त आणि आमच्या मार्गदर्शक विधिज्ञ निर्मलाताई सामंत- प्रभावळकर यांनी ‘दिविजा वृद्धाश्रम’साठी शासन दरबारी जे सहकार्य करतात; त्यांचेही ह्या निमित्ताने आभार!

पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त आभाळाएवढ्या शुभेच्छा आणि वृद्धांच्या सेवेला हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार!

– सुरेश डामरे
– नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page