सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 219 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):– किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पावसाने शंभरी पार केली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 137.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2576.138 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.):-
दोडामार्ग – 184(2500), सावंतवाडी – 210(2750.10), वेंगुर्ला – 86.60(2154), कुडाळ – 126(2412), मालवण – 27(2819), कणकवली – 185(2805), देवगड – 65(2339), वैभववाडी – 219(2830), असा पाऊस झाला आहे.
आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 2 हजार 830 मि.मी. झाला आहे. त्यानंतर मालवण, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, देवगड तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 2 हजार 154 मि.मी. झाला आहे.