बोध कथा- राक्षसाचा पुनर्जन्म

एका समृद्ध राज्यात एक भयंकर राक्षस राहत होता. त्याच्या क्रौर्यामुळे गावोगावी भीतीचं सावट पसरलं होतं. तो निरपराध लोकांचा छळ करत असे, त्यांच्या कष्टांची लूट करत असे आणि विरोध करणाऱ्यांचा निर्दयपणे नाश करत असे. अनेकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण सर्वजण अपयशी ठरले. अशा वेळी त्या भूमीत एक पराक्रमी आणि प्रामाणिक योद्धा उभा राहिला. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राक्षसाशी प्राणपणाने युद्ध केलं. अनेक दिवस चाललेल्या संघर्षानंतर अखेर त्याने राक्षसाचा वध केला. राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. प्रत्येकाच्या ओठांवर त्या योद्ध्याचं नाव होतं. त्याच्या धैर्याची, त्यागाची आणि पराक्रमाची सर्वत्र स्तुती होत होती.

पण सर्वांनाच ही स्तुती सहन झाली नाही. राज्यातील काही कपटी, स्वार्थी आणि लबाड लोकांच्या मनात मत्सराचं विष पसरू लागलं. `लोक योद्ध्याचंच कौतुक का करतात? आमच्याकडे कोणी लक्ष का देत नाही?’ हा विचार त्यांच्या मनात घर करून बसला. त्यांनी योद्ध्याला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले. अफवा पसरवल्या, कटकारस्थानं रचली, त्याच्यावर खोटे आरोप केले. पण सत्याचा पाया भक्कम असल्यामुळे त्याच्या पराक्रमावर कुठलाही डाग लावता आला नाही. शेवटी त्या कपटी लोकांनी एक भयावह निर्णय घेतला. त्यांनी मेलेल्या राक्षसालाच पुन्हा जीवंत केलं. इतकंच नव्हे, तर त्यालाच स्वतःचं नेतृत्व दिलं. “हा आमचा तारणहार,” असं म्हणत त्यांनी त्याला पुन्हा सत्तेच्या शिखरावर बसवलं.

क्षणभरासाठी त्यांना वाटलं की आता योद्ध्याचा प्रभाव संपेल. पण ते एक सत्य विसरले होते. राक्षस हा राक्षसच असतो. त्याला मित्र, निष्ठा किंवा कृतज्ञता माहीत नसते. त्याला फक्त सत्ता, भय आणि विनाश समजतो. ज्या योद्ध्याने एकदा त्याचा पराभव केला होता, त्याचं तो काहीही वाकडं करू शकत नव्हता. कारण योद्ध्याकडे सत्य, धैर्य सामर्थ्य आणि लोकांचा विश्वास होता.

मात्र ज्यांनी स्वतःच्या मत्सरासाठी राक्षसाला पुन्हा जिवंत केलं होतं, त्यांनाच राक्षसाने सर्वप्रथम गिळायला सुरुवात केली. त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं. तेव्हा उरलेल्या लोकांना एक गोष्ट कायमची समजली की, द्वेषाच्या भरात आपण ज्या राक्षसाला पुन्हा जीवंत करतो, तो शत्रूचा नव्हे; सर्वप्रथम आपलाच नाश करतो.

बोध…..
मत्सरामुळे सत्याशी वैर करणारे लोक अनेकदा स्वतःच्या विनाशाचं बी पेरतात. राक्षसाचा स्वभाव कधीच बदलत नाही; बदलतो तो फक्त त्याच्या बळींचा क्रम!

-मोहन सावंत

Moral Story- The Return of the Monster

Once upon a time, there was a peaceful kingdom. But a cruel monster lived there. He troubled everyone. He hurt innocent people, destroyed villages, and spread fear everywhere.

Many brave men tried to defeat him, but they all failed.

One day, an honest and fearless warrior came forward. He fought the monster with great courage. After a long and difficult battle, he finally killed the monster.

The whole kingdom celebrated. People were happy again. They praised the warrior for his bravery and thanked him for saving their lives.

But not everyone was happy.

Some clever but dishonest people became jealous of the warrior. They could not accept that everyone admired him. Their jealousy slowly turned into hatred.

They spread lies about the warrior. They made secret plans against him. They tried everything to destroy his good name. But they failed because the warrior was truthful and his bravery was known to everyone.

Finally, those dishonest people made a terrible mistake.

They brought the dead monster back to life.

Not only that, they accepted the monster as their leader. They believed that the monster would help them defeat the warrior.

But they forgot one important truth.

A monster is always a monster.

It never becomes loyal. It never feels grateful. It only wants power, fear, and destruction.

The warrior was not afraid. He had defeated the monster once, and he knew that truth and courage were stronger than evil.

But the dishonest people who had brought the monster back soon realized their mistake.

The monster did not protect them.

Instead, it started destroying the very people who had brought it back to life.

One by one, they lost everything.

Only then did the people understand the real lesson.

If you bring a monster back to life because of jealousy, it will not destroy your enemy first—it will destroy you.

Moral…

Jealousy can make people forget the truth. Evil never changes its nature. Those who support evil for selfish reasons often become its first victims.

-MOHAN SAWANT ✒️

error: Content is protected !!