चला पितृपक्ष साजरा करूया नव्या पद्धतीने : असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाकडून आवाहन
तळेरे (निकेत पावसकर):- पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ विविध विधी केले जातात. हे विधी करण्यासाठी अनेकजण प्रचंड पैसे खर्च करतात. त्याएवजी असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील वृध्दांना आपल्या पितृजनांची आठवण म्हणून मदत करुन पितृपक्ष वेगळ्या पध्दतीने साजरे करण्याचे आवाहन वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सव झाला की पितृपक्षातील सर्व विधी आटोपून मुंबईस्थित चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतात. अनेकदा पितृपक्षात आपल्या पुर्वजांच्या नावाने अन्नदान तसेच विविध दान केले जाते. आपली ती परंपरा आणि संस्कृती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत प्रिय जनाच्या आठवणींना उजाळा देण्याकरता पितॣपंधरवडयात अन्नदान करून त्यांचे स्मरण केले जाते. दिविजा वृद्धाश्रमातील आजी व आजोबांना एक दिवसाचे अन्नदान करून नव्या पद्धतीने पितृपक्ष साजरा करूया.
आपल्या ह्या सेवेने गरजवंत आजी आजोबांना एक दिवसाचे भोजन लाभणार आहे व दिविजा वॣध्दाश्रमातील आजी /आजोबा चे अनेक आशीर्वाद आपल्याला मिळतील.
संस्था व आश्रम उपकॣत्य राहिल. किंवा आपली आर्थिक मदत पुढील बँक खात्यात आपली जमा करावी व व्हॉट्स ॲपवर आम्हाला कळवावे .
You can transfer your Donations or drop a cheque in favour of
Name : Swastik Foundation
Account No. : 62483160440
Bank name : State Bank of India
IFSC code : SBIN0015445
Branch : Prabhadevi, Mumbai
For other details, Contact:-
Sandesh Shetye : 9223221400
Dipika Rambade : 8530700102