भगवान महावीर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.): भगवान महावीर फाऊडेशन तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या भगवान महावीर पुरस्कारासाठी इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशने मागविण्यात आलेली असून या संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक विकासाकरिता अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांना अहिंसा व शाकाहार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र व सामाजसेवा अशा 4 क्षेत्रांसाठी प्रोत्साहानात्मक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंमिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख, मानपत्र व सन्माचिन्ह असे आहे. तरी इच्छुक उमेदवार, संस्था यांनी अधिक माहितीसाठी www.bmfawards.org या वेबसाईटला भेट द्यावी अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय 02362 228869 येथे संपर्क साधावा असे आवाहन व्ही.सी. म्हात्रे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.