सिंधुदुर्गातील पाऊस, पाणीसाठा आणि नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3662.2325 मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -0(3612), सावंतवाडी -1(3983.10), वेंगुर्ला -0(2890.80) कुडाळ -1(3523), मालवण -37(3941.96), कणकवली -9(4007), देवगड -13(3165), वैभववाडी -08(4175) असा पाऊस झाला आहे.

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 417.1390 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 93.24 टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.

देवघर – 86.8570, अरुणा – 78.8736, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6424, नाधवडे – 2.3690, ओटाव – 3.3130, देंदोनवाडी – 0.8440, तरंदळे – 3.6180, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2840, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.339, ओझरम – 1.819, पोईप –0.732, शिरगाव – 1.348, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.900 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page