पाटलीपुत्र येथे श्रीगणेश पुनर्मिलापासाठी कृत्रिम तलाव

मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी गणेशोत्सव अत्यंत काळजीपूर्वक व साधेपणाने साजरा करायचा आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६२ व परिसरातील तमाम गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सुविधा पाटलीपुत्र, रिलीफ रोड, ओशिवरा येथे कृत्रिम तलाव निर्माण करून करण्यात येणार आहे. ह्या कृत्रिम तलावाचे उद्घाटन आज प्रभाग क्र. ६२ चे कार्यसम्राट नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर तसेच महापालिकेचे अधिकारी, पोलीस निरक्षक फंड साहेब, शाखाप्रमुख गोविंद वाघमारे, युवासेना विभाग अधिकारी मोहित राजू पेडणेकर, पाटलीपुत्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे मोहन सावंत, चेतन नाईक, रवि जाधव व देसाई, उपशाखाप्रमुख भरत यादव, राजू बनकर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ह्या कृत्रिम तलावामुळे विसर्जनस्थळी गणेश भक्तांची होणारी प्रचंड मोठी गर्दी कमी करण्यात येणार असून यासंदर्भात स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page