कॉस्मोपॉलिटन असोशिएशनतर्फे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा!
मुंबई:- जोगेश्वरी पश्चिम, पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनतर्फे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी सीबीएससी मुंबई पब्लिक स्कुल (प्रतीक्षा नगर) चे विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थिती लावली. ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय माडये यांच्या उपस्थितीत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. पोलीस निरीक्षक विजय माडये यांनी सायबर क्राईमबाबत नागरिकांनी दक्ष राहण्याचा सल्ला दिला. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.
सेक्रेटरी मोहन सावंत यांनी उपस्थित पाहुण्यांची ओळख करून दिली तर अध्यक्षा श्रीमती मंजू गुप्ता यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार मानले. खजिनदार मुख्तार अहमेद व इतर सर्व पदाधिकारी, सदस्य आपल्या कुटुंबियांसोबत कार्यक्रमास मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा सत्कार आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पदाधिकाऱ्यांनी केला.