सिंधुदुर्गातील आठ वर्षाच्या वरील रिक्षांवरती परमिट चढविण्याची मागणी!

तळेरे (संजय खानविलकर):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना यांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ वर्षाच्या वरील रिक्षांवरती परमिट चढविण्याच्या मागणीबाबत निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये (मुंबई वगळून) अन्य जिल्ह्यांमध्ये कुठल्याही मॉडेलच्या रिक्षांवर कुठल्याही मॉडेलचा परवाना वापरता येतो; परंतु फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आठ वर्ष झालेली ऑटोरिक्षा असेल तर त्यावर त्याच्या खालील माँडेलच्या असलेल्या रिक्षा परमिट वापरतात येत नव्हते. हा रिक्षाचालकांवर अन्यायकारक नियम सिंधुदुर्गमध्ये मध्ये सुरू असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली व त्यासंबंधी निवेदन देण्यात आले.याच्यावरती लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांनी दिले.

तसेच कोरोना कालावधीत आर.टी.ओ. तालुका कॅम्प बंद होते ते आर.टी.ओ.कॅम्प मे महिन्यापासून देवगड, वैभववाडी, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी येथे पूर्ववत सुरू करण्यात येतील; असे सांगितले.तसेच आर. टी. ए. कमिटीमध्ये अशासकीय सदस्य घेण्याबाबत चर्चा झाली.तसेच कोरोना कालावधीत ज्या रिक्षाचालकांचे परवाना नूतनीकरण संपले होते असे २८ रिक्षाचालकांचे परवाने नूतनीकरण झालेले आहेत. त्या रिक्षाचालकांनी आरटीओ ऑफिसला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी निवेदन देताना रिक्षा संघटना जिल्हा सचिव सुधीर पराडकर, ह्यूमन राईट राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, मालवण तालुका सचिव राजेश कुमार लब्दे. रिक्षा चालक रवी माने, विठ्ठल वालावलकर, नेपोलियन फर्नांडिस, म्हाडगुत, परब उपस्थित होते.