सिंधूदुर्ग आकाशवाणी केंद्रावर आज निकेत पावसकर यांची मुलाखत

तळेरे, दि. १:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांची १ मे ला सायंकाळी ५.३० वा. सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर मुलाखत प्रसारित होणार आहे. त्यांनी जोपासलेल्या अनोख्या सन्ग्रहाचा प्रवास यावेळी ते मांडणार आहेत. 

निकेत पावसकर यांनी गेल्या १६ वर्षांपासून जोपासलेल्या अनोख्या संग्रहाची दखल विविध संस्थानी घेतलेली आहेच. तर त्यांच्या संदेश पत्रांचे प्रदर्शने मुंबई, कोल्हापुर, लांजा, शिरोडा, बेळगाव यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाली असून रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळतो. त्यांच्या या संग्रहात देश परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७०० व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा समावेश आहे.

या संग्रहाच्या प्रवासाबद्दल विशेष मुलाखत सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. पावसकर यांची मुलाखत कार्यक्रम अधिकारी श्रीपाद कहाळेकर यांनी घेतली आहे.

You cannot copy content of this page