कॉस्मोपॉलिटन असोशिएशन उत्सव मंडळाच्यावतीने होलिकोत्सव आणि धुलीवंदन उत्साहात साजरा!
मुंबई:- सालाबादप्रमाणे जोगेश्वरी पश्चिम येथील कॉस्मोपॉलिटन को- ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशन उत्सव मंडळाच्यावतीने होलिकोत्सव आणि धुलीवंदनचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
होलिकोत्सव साजरा करताना प्रथम होळीची पूजा ब्राह्मणांच्या उपस्थित सुरेश जाधव व स्मिता जाधव ह्या उभययतांच्या शुभ हस्ते झाली. त्यांनतर आरती-गाऱ्हाणे झाले व उपस्थित सर्वांनी होळीचे पूजन केले आणि श्रीफळ नैवेद्य अर्पण केला. दुसऱ्या दिवशी धुलीवंदनचा सणही आनंदाने साजरा करण्यात आला. होळीच्या सर्व हिंदु बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधवांच्यावतीने मुस्ताक भाई, इजाजभाई यांनी प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी कॉस्मोपॉलिटन को- ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनच्या अध्यक्षा मंजू गुप्ता, उत्सव मंडळाचे सेक्रेटरी मोहन सावंत, खजिनदार चेतन नाईक यांनी त्यांचे आभार मानले.