सिंधुदुर्गात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

  • सिंधुदुर्गनगरी दि 5 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदान दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता मंगळवार दि.7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी निर्गमित केल आहेत. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.

    दि. 7/5/2024 रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद करण्याचे गावाचे नाव…
    कुडाळ तालुका – माणगांव, वालावल
    सावंतवाडी तालुका – सावंतवाडी (शहर), चौकुळ
    वेंगुर्ला तालुका – होडावडा
    कणकवली तालुका- कणकवली (शहर), तळेरे

You cannot copy content of this page