असलदे गावात कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे यांचे स्वागत!

श्री देव रामेश्वराच्या पवित्र भूमीत असलदे गावात आज केंद्रीय मंत्री सन्मा. नारायणराव राणे यांचे आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे, मित्रमंडळींतर्फे आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत!

येथे क्लिक करून हेही वाचा! -संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय!

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना… कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे असलदे गावात येत असताना त्यांचे स्वागतास मला स्वतःला उपस्थित राहणे नक्कीच आवडले असते; परंतु मी मुंबईत असल्याने ते शक्य नाही. तरीही आमच्या प्रेमाचा- आदराचा स्वीकार त्यांनी करावा; ही नम्र विनंती! सन्मा. नारायणराव राणे आपले असलदे गावात सर्व ग्रामस्थांतर्फे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत!

येथे क्लिक करून हेही वाचा! -प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे!

आमचा असलदे गाव निसर्ग संपन्न! येथील सुपुत्रांनी आपल्या स्वकर्तृत्वाने गावाचे नाव जगाच्या नकाशावर आणले. आज अशा व्यक्तिमत्त्वांची नाव घेतलीच पाहिजेत. थोर शास्त्रज्ञ म्हणून डॉ. समीर डामरे यांच्या संशोधनातून जग प्रभावित झाला आहे. कोकण विकास आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून गेली ४५ वर्षे सामाजिक सेवा करणारे बळीराम उर्फ आबा परब यांनी केलेले कार्य कोकणासाठी आदर्शवत तर आपल्या अभ्यासू वक्तृत्वाने अनिल तांबे यांनी राज्यात निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद आहे. कोकणात `सिंपन’ च्या माध्यमातून त्यांनी महान कार्याचा शुभारंभही केलेला आहे. असलदे पंचक्रोशीत सुरेश डामरे, विनय नरे ह्या यशस्वी व्यावसायिकांनी मुंबईत राहून सामाजिक बांधिलकी स्वीकारली आणि गेल्या ३० वर्षात जे कार्य केले ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, आताचे तरुण पत्रकार भगवान लोके, आदर्श निवृत्त शिक्षक प्रमोद लोके, रामचंद्र लोके, माजी सरपंच अंकुश डामरे, सुरेश लोके, सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश परब यांनीही गावासाठी दिलेले योगदानही निश्चितपणे भुषणावह आहे. स्वर्गीय नामदेव लोके, स्वर्गीय सुभाष लोके, स्वर्गीय सुभाष डामरे यांनी अनेकांना मुंबईत नोकरीस लावले. तर पत्रकारितेचा आधुनिक अध्याय स्वर्गीय किसन वायंगणकर यांनी लिहिला. स्वर्गीय नाना लोके (नाना मास्तर) ह्यांनी असलदे गावासाठी काही दशकांपूर्वी केलेले कार्यही महत्वपूर्ण आहे. हे सर्व असलदे गावाचे सुपुत्र!

येथे क्लिक करून हेही वाचा! -आमदार नितेश राणे अभिनंदन! अधिकाऱ्यावर वचक ठेवायलाच हवा!

वर्तमानात सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब ह्यांनी ग्रामपंचायतीला सक्षम नेतृत्व दिले. तर सचिन लोके, विनोद तांबे आणि देऊ लोके ह्या तरुणांनी यशस्वीरीत्या शेती व्यवसाय व शेती पूरक व्यवसाय करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. अशी अनेक नावं घेता येतील; ज्यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले. आज सन्मा. नारायणराव राणे गावात येत असताना सर्व आदर्श व्यक्तींची नावे घेणे क्रमप्राप्त ठरतं.

येथे क्लिक करून हेही वाचा!- जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?

असलदे गाव विकासाच्या बाबतीत आमच्या दृष्टीने आजही मागास आहे. आता ह्याची कारणे शोधत बसण्यापेक्षा सन्मा., नारायणराव राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात असलदे गावात विकासाची गंगा निश्चितच वाहायला लागेल!

काजूच्या उत्पादनातून असलदे गावाला उत्पन्न बऱ्यापैकी मिळते; पण गावात बारमाही पाणी आणि चोवीस तास वीज असणं गरजेचं आहे. तरच गावातील ग्रामस्थ शेतीकडे वळू शकतील, छोटे मोठे उद्योगधंदे करू शकतील. पियाळी नदी जवळ असल्याने तशी योजना गावात यावी आणि विजेसाठी सौरऊर्जेचा वापर व्हावा; असंही मला नेहमी वाटतं. असलदे गावात मंदिरं आहेत, पर्यटनाची स्थळ आहेत; तिथे मूलभूत सुविधा व्हायला पाहिजे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, वाचनालय असावं आणि मंजूर असलेल्या तलाठी कार्यालयाला कायमस्वरूपी तलाठी मिळावा; अशी अपेक्षा आहे. अशा अनेक योजना गावाच्या विकासासाठी आणल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे व्यसनाधिनता रोखण्यासाठी गावाच्या वेशीवर असलेले अनधिकृत दारू धंदे बंद होणे, मटका व्यवसाय बंद होणे गरजेचे आहे! तसेच आमचे परममित्र सन्मा. सुरेश डामरे यांनी नेहमीच राणे कुटुंबियांवर नि:स्वार्थी प्रेम केले. पण त्यामध्ये सुद्धा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न एका- दोघांनी केला. हे खेदाने नमूद करावसं वाटतं!

सन्मा. नारायणराव राणे, आमदार नितेश राणे यांनी आमच्या असलदे गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे: अशी मी जाहीररित्या विनंती करतो आणि आमची विनंती नक्कीच हे नेते मान्य करतील!

सन्मा. नारायणराव राणे श्री रामेश्वरच्या कृपेने खासदार म्हणून बहुमताने निवडून येतील आणि केंद्रात पुन्हा महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होतील; हे निश्चितच! त्यासाठी आम्ही नक्की सहकार्य करू!

येथे क्लिक करून हेही वाचा! समर्थ नेत्यालाच उमेदवारी!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page