महाराष्ट्रात आता ई-पासची गरज नाही; हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी!
मुंबई:- मार्च महिन्यापासून सुरु असणारे लॉकडाऊन संपले आणि अनलॉक सुरु झाले होते. आज महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन शिथीलकरणाच्या पुढच्या टप्प्यासाठी नवे नियम घोषित केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी यापुढे ई-पास बंधनकारक नसेल.
शासनाने काढलेल्या परिपत्रकात अनेक नियम आणि सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
१) राज्यातील शाळा, महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
२) रेस्टॉरंट, जिम, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एण्टरटेन्मेंट पार्क, मेट्रो बंदच राहणार.
३) मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरील बंदी कायम. लग्नासंबंधी कार्यक्रमांना ५० तर अंत्यसंस्कारांसाठी २० व्यक्तींनाच परवानगी.
४) सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या जागी तसेच प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक राहील.
५) सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे असून दुकानांमध्ये एकाचवेळेस फक्त ५ लोकांना परवानगी असेल.
६) सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई होईल.
७) सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू यांचे सेवन करण्यास बंदी असेल.
८) खासगी कार्यालयात तीस टक्के उपस्थितीसह काम करता येईल.
९) दक्षता घेऊन खासगी बस वाहतुकीला परवानगी असेल.
१०) याबरोबरच सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात काही सूचनाही देण्यात आल्या आहेत.
११) शक्य तितक्या प्रमाणात वर्क फ्रॉम होमच्या पर्यायाचा वापर करावा.
१२) सर्व सार्वजनिक स्थळांवर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायजर्स आणि हँडवॉश उपलब्ध असावा.
१३) हॉटेल्स आणि लॉजला पूर्ण क्षमतेने काम करण्याची मुभा.
१४) आंतरजिल्हा वाहतुकीला पासची गरज असणार नाही.
१५) सरकारी कार्यालयात `अ’ आणि `ब’ श्रेणीतील १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिर्वाय असेल.
१६) खासगी कार्यालयात कमाल ३० टक्के उपस्थिती ठेवता येईल.
१७) खुल्यावर व्यायाम करता येईल.
१८) सर्व प्रकारच्या वाहतुकीमध्ये मास्क आवश्यक टॅक्सीमध्ये (गरज असेल तरच) 1+3 लोकांना परवानगी, रिक्षामध्ये (गरज असेल तरच) 1+2 लोकांना परवानगी, चारचाकी (गरज असेल तरच) 1+3 लोकांना परवानगी, दुचाकी 1+1 लोकांना परवानगी (हेल्मेट, मास्क आवश्यक)
१९) ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांनी, कोमॉर्बिडीटी असणाऱ्या लोकांनी, गर्भवतींनी, १० पेक्षा कमी वय असलेल्या मुलांनी घरातच राहावे. आरोग्याचे कारण, अत्यावश्यक काम याशिवाय त्यांनी बाहेर पडू नये.