उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार १३ ऑगस्ट २०२१

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार १३ ऑगस्ट २०२१
शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- २२
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष पंचमी सायंकाळी १३ वाजून ४३ मिनिटापर्यंत आहे.
नक्षत्र- हस्त सकाळी ०७ वाजून ५९ मिनिटापर्यंत
योग- साध्य दुपारी १३ वाजून ४५ मिनिटापर्यंत
करण १- बालव दुपारी १३ वाजून ४२ मिनिटापर्यंत
करण २- कौलव १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कन्या सायंकाळी १९ वाजून २८ मिनिटापर्यंत आहे.

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २१ मिनिटांनी होईल.
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०५ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- दुपारी १० वाजून ३० मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- रात्री २२ वाजून ४३ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ८ वाजून ३६ मिनिटे आणि रात्री २१ वाजून २० मिनिटे
भरती- रात्री २ वाजून ४६ मिनिटे आणि दुपारी १५ वाजता

दिनविशेष:-

आज कल्की जयंती आणि सुपोदनवर्ण षष्टी दिन आहे.

आज आहे नागपंचमी,
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.

आज जरा-जिवंतिका पूजन केले जाते.
जरा आणि जिवंतिका या भारतात पूजल्या जाणाऱ्या दोन पुरातन देवता आहेत. या सप्त मातृकांपैकी आहेत, असेही मानले जाते. काही ठिकाणी जरा-जिवंतिका या देवांचे वैद्य असणार्‍या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत असाही उल्लेख आहे. जरा-जिवंतिकांविषयी माहिती स्कंद पुराणात आहे.

आज आहे, महाराणी अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी.
एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला.

You cannot copy content of this page