कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथून निवृत्त झालेल्या सहकाऱ्यांचा स्नेहमेळावा!

भेटीच्या सोहळ्याचा वृत्तांत!

आयुष्याची अनेक वर्षे ज्यांच्यासोबत घालवली ती माणसं आजही संपर्कात असताना बऱ्याचवेळा एकमेकांची भेट होत नाही. ह्या आपल्या जिवाभावाच्या माणसांना मनापासून भेटायला हवं; त्यांना डोळे भरून पाहण्यासाठी, काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्या आठवणीतील आनंद घेण्यासाठी! त्यासाठीच बुधवार २४ जानेवारी २०२४ रोजी एमआयजी क्लब, वांद्रे येथे कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथून निवृत्त झालेल्या सहकाऱ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता!

जीने का जज्बा़ कायम हो तो,
साल की गिनती फिर फि़जूल है|
अपने शौक़ जिंदा रखो जनाब,
जीने का बस यही उसूल है|

हाच जज्बा़ कायम ठेवून वयपरत्वे कंबरेचा पट्टा, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर सारख्या व्याधी सांभाळून वय वर्षे ६० पासून वय वर्षे ८१ दरम्यानच्या ११४ सहकारी स्नेहमेळाव्यात सामील झाले होते.

आयोजन कमिटीतर्फे श्री. विश्वनाथ सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले व सर्व प्रथम दिवंगत सहकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

“टेन्शन फ्री जगण्याचा आणि काही तास आनंदात घालवून सगळ्या आठवणींना उजाळा देणे, निखळ आनंद काय असतो? हे सांगणारे क्षण अनुभवायला मिळावेत; हाच या स्नेहमेळाव्याचा हेतू आहे. आजचा दिवस आपला आहे. भरपूर आनंद घ्या आणि आम्हांला आनंद द्या. हाच या भेटीचा अंतिम उद्देश आहे!” असे मायकेल परेरा यांनी प्रास्ताविकेत सांगितले.

मी सर्व सहकाऱ्यांसोबत खूप चांगलं आयुष्य जगलो आहे. कितीही प्रयत्न केला तरीही या आठवणी दूर सारू शकत नाही. पुन्हा एकदा सर्व सहकाऱ्यांसोबत एक दिवस घालवता येणार आहे; ह्याचा आनंद व्यक्त करायला माझेकडे शब्द नाहीत!” अशा भावना डॉ. मनोहर सावंत यांनी व्यक्त केल्या.

“आपलं रूटीन ठरलेलं असतं. या रूटीनमधून वेळ काढून सगळ्यांसोबत खळखळून हसायला लावणारी ही भेट! मनमोकळं हसणं प्रकृतीला चांगलं असतं. सकारात्मक उर्जा मिळते. ओढ लावणारा उत्तम असा दिवस आहे!” असे डॉ. माया वानखेडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

“अशा स्नेहमेळाव्यामुळे प्रत्येकजण रिफ्रेश होतो. आनंद देणारा दिवस. असे उपक्रम सगळ्यांना जोडून ठेवतात. त्यामुळे दरवर्षी स्नेहमेळाव्याचा आनंद अनुभवायला मिळावा!” अशी भावना डॉ. हेमंत भारती यांनी व्यक्त केली.

“जेव्हा जुने मित्रमैत्रीणी खूप दिवसांनी भेटतात तेव्हा खूप आनंद होतो. मैत्रीचा खरा अर्थ आताच कळलेला असतो. ही मैत्री व त्याची भेट हवीहवीशी वाटत असते. आयुष्याची इतकी वर्षे ओलांडल्यावर पुढचे आयुष्य बोनस आहे. तेव्हा या वळणावर सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटत राहू या!” असे श्री. रवी पाटील यांनी सांगितले व उत्तम नियोजनाबद्दल नियोजन कमिटीचे कौतुक केले.

डॉ मनोहर सावंत यांचा ८१ वा, श्री.सुधीर हडकर व श्रीमती वृ. प. पारकर ह्यांचा ७५ वा वाढदिवस व किशोर पांडे याचा लग्नाचा ४० वा वाढदिवस व अनेक सहकाऱ्यांचे जेष्ठपण हर्ष उत्साहात केक कापून साजरे करण्यात आले.

भेटीच्या आनंदाबरोबर काही करमणुकीचे मजेशीर खेळ खेळतानाही सर्वजण आपले वय विसरले होते.

शरद इंगळे यांनी सुंदर सुंदर गाणी गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. त्याचबरोबर श्याम गीध, डॉ. पुप्षा गायकवाड, प्रभा तेंडुलकर, श्रध्दा तेंडुलकर, सीमा सावंत यांनीही गाणी सादर केली. सीमा कर्वे यांनी आपली कविता सादर केली.

जेष्ठपण एन्जॉय करायचे ठरवले तर ते किती सुंदरपणे करता येते हे पुप्षक पालंडे, दिव्या शहा, ज्योती आमणे, शालीनी पाटील, डॉ. पुष्पा गायकवाड, शशिकला नांदूरकर, विजय मोरे, विनायक देशमुख, मोहन सावंत इत्यादींनी अनेक गाण्यावर नाच करून दाखवून दिले.

दु:ख व वेदना याच्या पलीकडे जाऊन एक वेगळा दिवस जगलो; अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. जगण्यातील रोजचा थकवा जाऊन एक वेगळी उर्जा निर्माण झाली होती.

आपलं ‘असणं’ जितकं महत्वाचं असतं तेवढंच आपलं ‘हसणं’ महत्त्वाचं असतं. अशा अतिशय सुंदर सुंदर वाक्यात व ओघवत्या वाणीत श्री. विश्वनाथ सावंत यांनी या सुंदर सोहळ्याचे सुत्रसंचालन केले व कार्यक्रमात आणखी रंगत आणली.

डॉ. भारती, डॉ. वानखेडे, डॉ. सावंतसह प्रत्येकाने कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल नियोजन कमिटीचे कौतुक केले. नियोजन प्रक्रियेचा भाग होणे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती; परंतु आमच्या एका आवाहनाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला म्हणून कार्यक्रम सुंदर झाला.  याकरिता आयोजन कमिटीने सर्व उपस्थितांना धन्यवाद दिले. 

विश्वनाथ सावंत, मोहन सावंत, संतोष देसाई, रविंद्र चव्हाण, किशोर पांडे आणि मायकेल परेरा यांनी स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करून तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली. श्री. मोहन सावंत यांनी पुलंच्या ‘नारायण’ सारखी अत्यंत महत्वाची भूमिका निभावली व कार्यक्रमात लागणारी प्रत्येक गोष्ट व वस्तू उपलब्ध करून दिली होती.

कार्यक्रमाची वेळ संपल्यानंतरही कोणीही तिथून हलायला तयार नव्हते. सर्वजण तेथेच रेंगाळत होते. या सर्व सहकाऱ्यांचे उत्साही आनंदी चेहरे पाहणे हा खूप सुखद अनुभव होता. वर्षभर लक्षात राहिल असा आठवणीतील गोड दिवस!

-मायकल परेरा


स्नेहभेटीचा आनंदोत्सव!

भेटीचा आनंद आणि आनंदची भेट झाल्यावर जो काही उत्साह निर्माण होतो तो मानवी जीवनात खराखुरा आनंद देणारा असतो. हा आनंद चिरकाल टिकतो. ह्या आनंदाच्या शिदोरीवर आमचं कंटाळवाणं दैनंदिन आयुष्य बहरतं!

निवृत्तीचे जीवन जगताना वर्षानुवर्षे आपणास साथ देणारे कार्यालयातील आपले सहकारी दुरावतात. फक्त फोनवरून एकमेकांची चौकशी करून आनंद मानला जातो. पण जेव्हा सर्व सहकाऱ्यांना एकत्रित भेटण्यासाठी आपण नियोजन पद्धतीने एकत्र येतो तेव्हा मात्र जे काही मिळतं ते शब्दात वर्णन करता येणारं नसतं. मनातील त्या भावनांना शब्दांकित करणं शक्य नाही. अशावेळी आपण एकमेकांशी सुसंवाद साधतो, एकमेकांची आपुलकीने चौकशी करतो, सुखदुःख समजावून घेतो! ह्यातून जे आपुलकीचे नातं तयार होतं, ते कधीही न तुटणारं असतं.

राज्य कामगार विमा योजना, मुंबई ह्या खात्याच्या निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे एक दिवशीय स्नेहसंमेलन कालच मुंबई वांद्रे येथील एमआयजीच्या सभागृहात मोठ्या थाटामाटात, उत्साहात, आनंदात संपन्न झाले. त्यावेळी मला नेमकं काय वाटलं ते मी वरच्या परिच्छेदात मांडण्याचा प्रयास केला.

असाच प्रयास तुम्ही सर्वांनी करावा; अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी आपले मनोगत लिहा…. तुम्हाला वाटल्यास त्यात आम्ही सुधारणा करू! तुम्ही तुमचा ऑडिओ किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करा, तो पाठवा! तो सुद्धा तुम्हाला वाटल्यास तंत्रशुद्ध पद्धतीने एडिटिंग करू! त्यामुळे काय होईल? तो भेटीचा आनंद एकाच दिवसासाठी मर्यादित न राहता तो आनंद चिरकाल टिकेल! त्यामध्ये काही अडचण असल्यास अवश्य फोन करा, मॅसेज पाठवा! तर तुमच्या पाठवता ना प्रतिक्रिया!

-मोहन सावंत
सहसंपादक- स्टार वृत्त


निवडक प्रतिक्रिया…

हे वाचून असे वाटले की खरोखरच आपण फक्त कार्यालयातील सहकारी नसून एकमेकांचे मित्र मैत्रिणी झालो आहोत. परेरांनी भावनिक शब्दात सर्वांना ओवले आहे. ही ओढ कायम असावी. पुढील जानेवारी महिना कधी येतो? याची वाट पाहूया! पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे आभार!
-प्रभा


कार्यक्रमाच्या यशाचे सारे अंतिम श्रेय, ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक उपस्थिती आहे. हा कार्यक्रम आपल्या प्रत्येकाचा स्वतः चा होता. त्याच प्रमाणे प्रत्येकजण घरचे कार्य असल्यासारखाच, केवळ उपस्थित नाही तर सहभागी झाला. ह्या करणानेच खरी रंगत आली आणि समारंभ चैतन्यमय झाला. सगळ्यांनाच व्यक्त होता येतं असं नाही, पण सगळ्यांच्याच चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत होता! हे निर्विवाद जाणवत होतं आणि हीच आपली फलश्रुती होती व ती साध्य झाली; ह्याचे समाधान वाटते!
मैत्रीमध्ये नो सॉरी, नो थँक्स, नो आभार, नो धन्यवाद!

फरिश्ते होते हैं वह लोग जो दूसरों की खुशी का खयाल रखते हैं.
-किशोर पांडे


अतिशय समृद्ध असा सोहळा याची देही याची डोळा‌ पाहीले‌ आज Shrimukh आवडिने so please celebrate this programme every year God bless all friends to live. Happiest moment in their life.
-विजय मोरे


भेटीचा आनंद सोहळा….. हे वाचताना सुद्धा त्या दिवसाचे अनुभवलेले क्षण डोळ्या समोर उभे राहतात…आयोजक तसेच या कार्यक्रमास सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद!
-प्रकाश गोडसे


डॉ.भारतीसरांनी आपल्या कार्यक्रमासाठी रु. 10000/- जमा केले. त्याप्रमाणे अण्णा हडकर यांनी रु. 11001/-, रवी पाटील यांनी रु. 11000/- शरद इंगळे यांनी रु. 5000/- दिले आहेत. हे आपल्याला माहीत आहेच. कारण कार्यक्रमा दिवशीच मी ते जाहीरपणे सांगितले आहे. या सर्वांना आयोजन कमिटीतर्फे मनापासून धन्यवाद! आपल्या या सहकाऱ्यांच्या कृतीतून, गोष्टीतून या स्नेहभेटीबद्दल प्रेम जिव्हाळा दिसत आहे! परत एकदा धन्यवाद!
-मायकल परेरा


Get Together very much well organised and getting better and better. All efforts of organising committee could be seen . Keep it up . Lovely photographs. Had to miss post lunch session which was more of fun. Great going, keep it up. High appreciation for all committee members!
-डॉ माया वानखेडे


I want to thank so much for all of your help, coordinating the entire program. Everything went amazingly well that day. You all had a hard job and specially, Vishwanath Savant & Pareira did it very welI, I will be sure to expect you to organise similar get together in the future!, Yes , Every year Let me express appreciation & many many thanks to you all.
-डॉ हेमंत भारती


Sarva na namaskaar! aplya sarvaa na ekatra karanyaa je kaam aplyaa team ne kele ahe te kharokhar koutuk karnya sarkhe ahe. Hee team gela mahinya peksha jsasst divs atonaat mehenat ghet hoti hey me svtaa baghtle ahe. Ya team ne aplya sarvaana khup khup aanand milvun dila ahe. Sarva na salaam!
-शरद इंगळे


कालचा आपला ESIS चा ३ रा स्नेह भेटीचा कार्यक्रम आयोजकांनी मोठ्या धडाडीने, आत्मविश्वासाने यशस्वी पार पाडल्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम नेहमी प्रमाणे यशस्वी होण्यासाठी सर्वांचा सहयोग व मेहनत अभूतपूर्व आहे. आपल्या उत्कृष्ट संयोजनासाठी सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार!
-शाम गिध


रा. का. वि. यो. सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांचे स्नेहसंमेलन. वर्ष ३रे. मनात असूनही तिन्ही स्नेहसंमेलनाला पूर्व नियोजित कार्यक्रम आणि कौटुंबिक अडचणी यामुळे येता आले नाही. त्यामुळे सहकाऱ्यांना भेटीचा योग नव्हता. असो कार्यक्रम छान झाला, तो होणारच. कारण आयोजक हे प्रथम पासूनच धडाडीने काम करतात हे आपल्या योजनेत कामाला लागल्या पासून पहात आलो आहे. चांगल्या कार्यक्रमाला मुकलो. असो पुढील संमेलनास अवश्य येणार! सर्व आयोजकांचे आभार आणि धन्यवाद!
-शिरीष गं. कांबळी


कालचा ESIS गेट टुगेदर कार्यक्रम खूपच छान झाला .सर्व सहकारी मित्र मैत्रीणीना एकत्र भेटून आनंद झाला.सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार!
-दर्शना सावंत


कालचा कार्यक्रम खूपच छान झाला.सर्व सहकारी भेटले.खूप गप्पा मारल्या.सर्व आयोजकांचे मनापासून अभिनंदन!
-सुनंदा जोशी


कालचा कार्यक्रम खूपच छान झाला आयोजकांनी घेतलेल्या परिश्रमाबद्धल त्यांचे अभिनंदन! तसेच इंगळे मास्टर गीत व किशोर यांनी केले ल्या मनोरंजनाबाबत त्यांचेही अभिनंदन!
-श्रीमती पाटणकर


कालचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम खूप छान झाला. जुने सहकारी भेटले. मनसोक्त गप्पा मारता आल्या. मनोरंजनही झाले. एका दिवसात भरपूर एनर्जी मिळाली. कालच्या आठवणी व एनर्जी यामुळे पुढचे खूप दिवस छान जातात. सर्व आयोजकांचे मनापासून आभार!
-माधुरी परेरा


कालचा स्नेहसंमेलन कार्यक्रम खूप सुंदर, सुटसुटीत झाला.कार्यक्रमाचे नियोजन खूपच छान होते. सर्वच आयोजकांचे आणि श्री.शरद इंगळे यांचे खूप खूप आभार!
-श्रीमती अनुप्रिती खैर


आयोजकांना खूप खूप धन्यवाद!
-श्रीमती स्मिता सावंत


Excellent programme. Thanks everyone. Waiting for next program.
– Divya Shah


Get together Farachan & bahardar Zale Ayojakanche Abhar!
-V. M.Deshmukh


खुपच छान लिहिले आहे. आमच्या मनातील भावना तुम्ही मांडलेल्या आहेत. पुन्हा एकदा तुमचे व सवॅ आयोजकांचे मनापासून आभार!
-वृंदा पारकर


युट्युब वरील काही व्हिडीओ लिंक…

 


(ह्याच लिंकच्या पेजवर स्नेहमेळाव्याबाबत प्रतिक्रिया, फोटो, व्हिडीओ व इतर माहिती प्रसिद्ध केली जाईल.)

आनंदाच्या भेटी आणि भेटीचा आनंद…

You cannot copy content of this page