सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय! – सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप

असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचा शुभारंभ;
लोक सहभागातून उभारली यंत्रसामग्री

कणकवली (प्रतिनिधी):- देशातील विकास संस्थांचे सक्षमीकरण, बळकटीकरण करण्याचे काम केंद्र, राज्य सरकारने हाती घेतले आहे. विकास सोसायट्या 100 टक्के संगणीकरण करायचे आहेत. असलदे संस्थेचा अभिमान वाटतो, सभासदाच्या योगदानातून संगणक व अन्य साहित्य घेतले आहे. सिंधुदुर्गात खारेपाटण नंतर असलदे सोसायटीने हे कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु केले आहे. त्यामुळे संस्था, शेतकरी, नागरिक अभिमानास पात्र आहेत. या संस्थेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर आयडीसाठी चेअरमन भगवान लोके यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हे सेंटर सुरु होत आहे. या सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची ऑनलाईन सेवेची कामे एकाच छताखाली होतील. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शेतकरी नागरिक संस्थांमध्ये असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कणकवली सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप यांनी केले.

असलदे श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कॉमन सर्व्हिस सेंटरचा (CSC) शुभारंभ फित कापून सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप व मंडळ अधिकारी ए. आर. जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चेअरमन भगवान लोके, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, माजी चेअरमन प्रकाश परब, तलाठी प्रविण लुडबे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर खोत, आयनल चेअरमन बाळा चिंदरकर, ग्रामसेवक संजय तांबे, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, उदय परब, शामू परब, परशुराम परब, प्रकाश खरात, संतोष परब, कांचन लोके, राजु लोके, निवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके, माजी सरपंच सुरेश लोके, लक्ष्मण लोके, ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे, सुवर्णा दळवी, स्वप्ना डामरे, विदया आचरेकर, मिनाक्षी डामरे, प्रविण डगरे, बाबाजी शिंदे, संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर, रामचंद्र जेठे, श्रीधर डामरे, तुषार घाडी, देवू लोके, रघुनाथ लोके, प्रशांत लोके, जयराम डामरे, अनिल नरे, सिताराम डगरे, संजय डगरे, गणपत शिंदे, वासुदेव दळवी, नारायण परब, सचिव अजय गोसावी, पोलिस पाटील सावित्री पाताडे, डाटा ऑपरेटर गौरी लोके, कोतवाल मिलिंद तांबे, ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब, प्रकाश वाळके, सायली दळवी आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. धुळप म्हणाले की, ग्रामीण स्तरावर आर्थिक विकासाची केंद्र म्हणून विकास संस्थांकडे पाहिले जाते. असलदेत विकास संस्था आणि नागरिकांचे अतूट नाते आहे. त्यातूनच प्राथमिक कृषी संस्था बळकट होतील. नाविन्यपूर्ण उपक्रम सीएससी सेंटर माध्यमातून केला. शासनाने डिजीटल ॲक्सेस निर्माण करुन दिला आहे. शेतकरी नागरिक संस्थेत आल्यानंतर सर्व सेवा एकाच छताखाली मिळतील. 226 सोसायट्यामध्ये असलदे चेअरमन भगवान लोके यांचे खंबीर नेतृत्व आहे. सिंधुदुर्गात असलदे संस्था आदर्शवत संस्था नावारुपास येईल.

सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले की, सोसायटीचे काम चांगल्या प्रकारे सुरु आहे. ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे विकासकामे मार्गी लावली जातील . राजकीय मतभेद विसरुन काम केल्यास गावाचा सर्वागिण विकास होईल. सोसायटीला ज्या ज्या लोकांनी मदत केली , त्याचे आभार मानले.

चेअरमन भगवान लोके म्हणाले की, रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्यावतीने कॉमन सर्व्हिस सेंटरचा हा नविन्यपूर्ण उपक्रम सुरु करत आहोत. गावातील दानशुर व्यक्तिमत्त्वांना मदतीचे आवाहन केले त्यात उद्योजक प्रकाश तोडणकर यांनी झेरॉक्स मशिन, उद्योजक व समाजसेवक सुरेश डामरे यांनी कॉम्पुटर व प्रिंटर, राजु लोके यांनी 11 हजार रुपये, प्रमोद लोके यांनी 2 हजार 500 रुपये देऊन सढळ हस्ते मदत केली. डिजीटल युगात आता नागरिकांना, शेतकरी सभासदांना शासनाच्या सेवा या सेंटरमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना 20 रुपयात सातबारा या सीएससी सेंटरच्या माध्यमातून दिला जाणार आहे. सोसायटी सक्षमीकरण बळकटीकरण करण्यासाठी शासनाने सीएससी सेंटर उभारण्याचे धोरण आणले आहे. आता एका क्लिकवर कर्ज व्यवहार , शेअर्सची माहिती मिळेल.

या कार्यक्रमात संस्थेच्यावतीने पहिला मोफत सातबारा शेतकरी नारायण परब यांना देण्यात आला. संस्थेला आर्थिक मदत केल्याबद्दल राजु लोके यांचा शाल, श्रीफळ , पुच्छगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार सचिव अजय गोसावी यांनी मानले.

You cannot copy content of this page