आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या शुभहस्ते गणेश मैदानाचे उदघाटन
मुंबई (मोहन सावंत):- अंधेरी (प.) येथील लोखंडवालामधील अपनाघर को-ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या गणेश मैदानाचे उदघाटन भारतीय जनता पार्टी-शिव संग्राम पक्षाच्या वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या शुभहस्ते नुकतेच झाले. त्याप्रसंगी नगरसेवक योगीराज दाभाडकर, नगरसेवक रंजना पाटील, प्रख्यात अभिनेत्री आणि थोर गायिका सलमा आघा, विनोदी अभिनेता सुनील पाल, भाजपचे मंडळ अध्यक्ष पंकज भावे, वार्ड ६० च्या अध्यक्षा आकृती प्रसाद मॅडम, अनेक मान्यवर राजकीय- सामाजिक नेते, परिसरातील सोसायट्यांमधील पदाधिकारी, रहिवाशी उपस्थित होते.
आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या आमदार फंडातून गणेश मैदानाचे नूतनीकरण, सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे येथील रहिवाशांना, मुलांना मोकळे सुंदर मैदान उपलब्ध झाले. स्थानिक रहिवाशांनी व अपनाघर को-ऑप. हौसिंग सोसायटी अससोसिएशनच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे जाहीर आभार मानले. यावेळी ऑर्केस्ट्रा व नृत्य कार्यक्रम आणि हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला. ऑर्केस्ट्रामध्ये प्रख्यात अभिनेत्री आणि थोर गायिका सलमा आघा यांनी काही प्रसिद्ध हिंदी गीतांची कडवी गायली आणि विनोदी अभिनेता सुनील पाल यांनी विनोदी अभिनय करून उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर समयोचित सूत्र संचालन मंजू गुप्ता मॅडम यांनी केले. त्याबद्दल त्यांचे आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. जोगेश्वरी (प.) पाटलीपुत्रमधील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या महिला सभासदांनी ह्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शविली.
Inauguration of Ganesh Maidan by MLA Dr. Bharti Lavekar
Mumbai (Mohan Sawant): – Apnaghar CHS at Lokhandwala Association’s Ganesh Maidan inaugurated by Bharatiya Janata Party – Shiv Sangram Party’s Versova Assembly to MLA Dr. Bharti Lavekar recently. On the occasion corporator Yogiraj Dabhadkar, corporator Ranjana Patil, famous actress and great singer Salma Agha, comedian Sunil Pal, BJP board president Pankaj Bhave, ward 60 president Aakriti Prasad Madam, many eminent political and social leaders, office bearers of local societies and residents were present.
Ganesh Maidan was renovated and beautified from MLA Dr. Bharti Lavekar’s MLA fund. As a result, beautiful grounds were made available to the residents and children. Local residents and homeowners co-op. Housing Society Association Public thanks to MLA Dr. Bharti Lavekar.
An orchestra and dance program and a turmeric ceremony were held at this time. Renowned actress and great singer Salma Agha sang some famous Hindi songs in the orchestra and comedian Sunil Pal won the admiration of the audience with his comedic performance.
Madam Manju Gupta conducted the program in a very beautiful and timely manner. His about it MLA Dr. Bharti Lavekar was felicitated. Women members of the Cosmopolitan Co-op Housing Society Association in Jogeshwari (W) Pataliputra made a special appearance at the event.
Subscribe now to Star Vrutta channel: https://www.youtube.com/channel/UCoUz7fX8hQAuP_QpDH76zFQ